*जि.प.शाळा कसबेपाडा (वाघेरा)*
*आदर्श शाळा पुरस्कार जाहीर*
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत मधील जि.प.शाळा कसबेपाडा शाळेला आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय बदादे सर यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेचे नाव जिल्ह्यात ओळखीचे केले.विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेत भर घातली.२००४ पासून वस्तीशाळा ते जि.प.शाळा असा सरांचा शैक्षणिक प्रवास आहे.निवासी शिक्षक असल्याने इथल्या विद्यार्थ्यांकडे आणि शाळेच्या वास्तुंकडे विशेष लक्ष असते.दरवर्षी वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, जनरल नॉलेज स्पर्धा, विद्यार्थी परसबाग, अशा विविध उपक्रम शाळेत राबविले जातात.यातुनच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि धैर्य निर्माण होते,शाळेला मिळालेला आदर्श पुरस्कार गावासाठी आनंदाची गोष्ट आहे, यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अमिशा मित्तल, शिक्षणाधिकारी बच्छाव सर, गटशिक्षणाधिकारी चव्हाण सर, विस्तार अधिकारी पगार सर, केंद्रप्रमुख बच्छाव मॅडम, आदी अधिकारी व शिक्षकवर्ग उपस्थित होते,मुख्याध्यापक श्री संजय बदादे सर व शिक्षीका चव्हाण मॅडम यांच गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे..