दै : सारथी महाराष्ट्राचा / प्रतिनिधी – कृष्णा गायकवाड
दिनांक १६ अनाधिकृत बांधकाम हटवण्यावरून नाशिक शहरात तणाव तर समाजकंटकांनी केली. दगड फेक तर दगड फेकीत कित्येक वाहनांच्या नुकसानी सह पोलीस कर्मचारी ही जखमी झाल्याचे घटना नाशिक शहरांमध्ये काठे गल्ली येथे घडली असता याबाबत सविस्तर वृत्त नाशिक शहरामध्ये काठे गल्ली ओपन स्पेस येथे मुस्लिम बांधवांनी एक दर्गा उभारलेली होती.
ही अनधिकृत असल्याचा दावा परिसरातील लोकांनी केला होता .त्यांनी ही दर्गा हटवण्याची मागणी केली होती. या सर्वांच्या अनुषंगाने येथील नागरिक देखील न्यायालयात गेले होते आणि न्यायालयाने दर्गा हटवण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेला दिलेल्या होत्या.
मात्र एक एप्रिल रोजी महानगरपालिकेने पंधरा दिवसाची मुदत देत सदर हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेण्यास सांगितले होते. मात्र पंधरा दिवस उलटून देखील संबंधित धार्मिक स्थळ ते हटवण्यात आलेले नव्हतं मात्र या सगळ्यांमुळे एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले होते.
आणि आज या धार्मिक स्थळावरती पुन्हा एकदा कारवाई केल्या जाणार होती. काल रात्री पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता आणि त्याच दरम्यान जवळपास ४०० ते ५०० लोकांचा जमाव या परिसरामध्ये एकत्र आलेला होता. त्यांनी अचानकपणे पोलिसांवरती दगडफेक करायला सुरुवात केली.
यामध्ये नाशिक शहर पोलिसांचे जवळपास २०ते २५ पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहे .पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्याचा वापर करावा लागला.येथे वीजपुरवठा खंडित असल्याचे पाहून समाजकंटकांनी ही दगडफेक केली धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम मुद्द्यावरून उडालेल्या अफवे नंतर ही दगडफेक करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.
मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावामुळे परिस्थिती चीघळली आणी दगडफेक सुरू झाली. मात्र पोलिसांनी वेळेवर अथक प्रयत्न करीत गदिॅवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले…. यावेळी पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी थोडक्यात दिलेली माहितीनुसार ज्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम काढण्याचे ठरवले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास बांधकाम काढण्यासाठी आलेले होते.परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानाचौक येथे गुंड लोकांचा जमाव त्याठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजावण्यासाठी धर्माचे ट्रस्टी नागरिक त्या ठिकाणी गेले.
त्यांनी त्यांना त्या ठिकाणी जुमलं नाही पोलीस स्थानिक ठिकाणी हजर होते. अधिकारी हजर होते त्यांनी देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांनी ऐकून घेतलं नाही.उलट त्यांनी पोलीस प्रशासनावर दगडफेक केली सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततेचे वातावरण आहे.